INDW vs ENGW : माफक आव्हान देऊनही भारतीय महिला झुंजल्या... मात्र हातून मालिका निसटली

INDW vs ENGW
INDW vs ENGWesakal

INDW vs ENGW : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 विकेट्स राखून पारभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 80 धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 12 व्या षटकातच पार केले. इंग्लंडने तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका 2 - 0 अशी खिशात घातली आहे.

INDW vs ENGW
Suryakumar Yadav : आयपीएल आहेच की... सूर्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी असं का म्हणाला?

मुंबईच्या वानेखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत भारताची अवस्था 5 बाद 34 धावा अशी केली होती. भारताकडून स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज या दोन बॅटरच दुहेरी आकडा गाठू शकल्या. (Women Cricket)

स्मृतीने 10 तर जेमिमाहने 30 धावांचे योगदान दिले. भारताच्या इतर कोणत्याही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताचा संपूर्ण डाव 80 धावात संपुष्टात आला. इंग्लंडकडून चार्लेट डीन, लॉरेल बेन, एकलस्टोन सारा ग्लेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

INDW vs ENGW
Hardik Pandya : टीम इंडियात परतण्याचा मुहूर्त ठरला! हार्दिक पांड्याबाबत जय शहांनी दिली मोठी अपडेट

भारताचे 80 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेणुका सिंह ठाकूरच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या तीन षटकातच दोन विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर एलिस कॅप्सी आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी डाव सावरत संघाचे आठव्या षटकातच अर्धशतक धावफलकावर लावले.

कॅप्सीने 25 तर ब्रंटने 16 धावा केल्या. दरम्यान, दिप्ती शर्माने एमी जोन्स आणि फ्रेया कॅम्पला पाठोपाठ बाद करत इंग्लंडची अवस्था 6 बाद 73 धावा अशी केली. मात्र सोफी एकलस्टोन आणि हेथर नाईटने विजयाची औपचारिकता 12 व्या षटकातच पूर्ण केली.

मालिकेतील तिसरा टी 20 सामना हा 10 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com