esakal | ENG W vs IND W, 1st T20I : दोघींनी केली धावांची बरसात!
sakal

बोलून बातमी शोधा

England Women

ENG W vs IND W, 1st T20I : दोघींनी केली धावांची बरसात!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली महिला संघाला वनडे मालिकेत 2-1 असा पराभव स्विकारावा लागला होता. वनडे मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने महिला संघ मैदानात उतरला. पण इंग्लंडच्या महिला संघाला थोडक्यात आटोपण्यात भारतीय संघाला कुठेतरी अपयश आले. (England Women vs India Women, 1st T20I Harmanpreet Kaur Win Toss India Women opt to bowl)

इंग्लंडची सलामीची फलंदाज टॅमी ब्यूमॉन्ट आणि डॅनियल वॅट या दोघींनी अर्धशतकी भागीदारी करत हरमनप्रीतचा निर्णय व्यर्थ ठरवला. राधा यादव ने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यापूर्वी डॅनियल वॅटने 28 चेंडूचा सामना करताना 3 चौकाराच्या मदतीने 31धावांची उपयुक्त खेळी केली होती. पूनम यादवने टॅमी ब्यूमॉन्ट 18 धावांवर बाद करुन भारतीय महिला संघाला आणखी एक दिलासा दिला.

हेही वाचा: कोरोनाचा फटका; श्रीलंका-भारत मालिका पुढे ढकलली!

इंग्लंडची कर्णधार हेदर नाईट हिला अवघ्या 6 धावांवर रन आउट झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला कमी धावांत रोखेल असे वाटत होते. पण नॅटली स्कायवर आणि अ‍ॅमी एलेन जोन्स या दोघींनी भारतीय महिला गोलंदाजांचे खांदे पाडले. त्यांनी स्फोटक खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेऊन पोहचवले. या दोघींनी 78 धावांची मोलाची भागीदारी रचली. 19 व्या षटकात शिखा पांड्येनं नॅटली स्कायवर 55 (27), अ‍ॅमी 43 (27) आणि सोफिया 1(2) यांची विकेट घेत इंग्लंडला दोनशेपार जाण्यापासून रोखले. इंग्लंडच्या महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 षटकात 7 बाद 177 धावा करुन हरमनप्रीतच्या संघासमोर मोठे आव्हान ठेवले.

भारतीय महिला संघ

स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरलीन देओल, हरमनप्रित कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, शिखा पांड्ये, राधा यादव, पूनम यादव.

loading image