esakal | कोरोनाचा फटका; श्रीलंका-भारत मालिका पुढे ढकलली!
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricket Team

कोरोनाचा फटका; श्रीलंका-भारत मालिका पुढे ढकलली!

sakal_logo
By
सुशांत जाधव

श्रीलंकन क्रिकेट कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारत-श्रीलंका यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक कोलमडले आहे. 13 जुलैपासून सुरु होणारी वनडे मालिका आता 17 जुलैपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नव्या वेळापत्रकानुसार 17 जुलै रोजी पहिला सामना खेळवण्यात येईल. (India Sri Lanka ODI series postponed to July 17 due to COVID19 cases in the Sri Lankan camp Rescheduled Time Tabale)

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह 3 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी वनडे तर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी-20 मालिकेतील सामने खेळवण्यात येणार होते. पण यात आता बदल झाला आहे.

हेही वाचा: Wimbledon : फेडररला आउट करणारा हिरो बेरेट्टिनीसमोर ठरला झिरो!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेला अवघे काही दिवस बाकी असताना इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या श्रीलंकन संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झालाय. श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचे बॅटिंग कोच ग्रँड फ्लावर यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त पहिल्यांदा समोर आले. त्याच्या पाठोपाठ टीमसोबत असलेल्या डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अन्य खेळांडूचे कोरोनाचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे श्रीलंका बोर्डाने म्हटले आहे. पण खबरदारीच्या पार्श्वभूमीवर 13 तारखेला सुरु होणारी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, भारत-श्रीलंका दौऱ्यासाठी इंग्लंड दौऱ्यावरील अनेक खेळाडू संघाबाहेर ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंडच्या संघाने ज्याप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध वेगळा संघ खेळवला तसाच काहीसा निर्णय श्रीलंका बोर्ड देखील घेऊ शकते. इंग्लंड दौऱ्यावरील संघाने खूपच खराब कामगिरी केली होती. वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेतील एकही सामना त्यांना जिंकता आला नव्हता. परदेशातील पराभवाची जखम भरुन काढण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्ड नेमका काय पर्याय शोधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचे सुधारित वेळापत्रक

वनडे मालिका

पहिला सामना : 18 जुलै

दुसरा सामना : 20 जुलै

तिसरा सामना : 23 जुलै

टी-20 मालिका

पहिला टी-20 सामना  : 25 जुलै

दुसरा टी-20 सामना  : 27 जुलै

तिसरा टी-20 सामना  : 29 जुलै

loading image