इंग्लंडची पहिली पसंती फुटबॉलला 

बुधवार, 4 जुलै 2018

 मँचेस्टर - इंग्लंडचे खेळप्रेमी कोणत्या खेळाला सर्वात जास्त मान देतात या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले. जबरदस्त लयीत असलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाचा मुकाबला भारतीय संघासोबत होणार होता. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार होता. नेहमी भारतीय संघ खेळणार म्हणल्यावर प्रेक्षागृह खाचाखच भरून जाते. या सर्व विचारांना छेद मिळाला. 

पहिल्या टी२० सामन्याला मँचेस्टरच्या प्रेक्षकांनी अपेक्षित गर्दी केली नाही. कारण एकदम सरळ साधे होते. त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी इंग्लिश फुटबॉल संघाचा अत्यंत महत्वाचा उप उपांत्यपूर्व फेरीचा सामना कोलंबिया विरुद्ध रंगणार होता आणी त्याची चालू होण्याची वेळ संध्याकाळी ७ ची होती. साहजिकच ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानापेक्षा मँचेस्टरच्या प्रेक्षकांनी मँचेस्टर युनायटेड क्लब चा रस्ता धरला आणि क्लब बाहेरच्या मोकळ्या जागेवर उभारलेल्या  भल्यामोठ्या पडद्यावर इंग्लंड विरुद्ध कोलंबिया सामना बघणे पसंत केले.   

इतकेच काय आमच्या पत्रकार कक्षातही पत्रकारांचे डोळे आणि मन टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप सामन्याकडे होते. संध्याकाळी साडेपाच वाजता क्रिकेट सामन्याची नाणेफेक होत असताना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जेमतेम ५-७ हजार प्रेक्षक होते आणि त्यातही अनिवासी भारतीय क्रिकेट प्रेमींची संख्या ९०% होती . 

कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा अपेक्षित निर्णय घेतला होता. रैना आणि लोकेश राहुल दोघांनाही संघात जागा देताना कोहलीने रैनाच्या अष्टपैलू गुणांचा विचार केला. 

Web Title: England's first choice is football