
मुंबईत आता अव्वल दर्जाचे फुटबॉलपटू घडताना दिसणार आहेत. जागतिक फुटबॉल क्षेत्रातील प्रसिद्ध अशा इंग्लिश प्रीमियर लीगचे भारतातील कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे.
भारतात फुटबॉलचा प्रसार करणे, तसेच स्थानिक पातळीवर अधिकाधिक भागीदार, प्रायोजक व चाहते मिळवणे, लीगचा आणि संलग्न क्लबचा विस्तार करणे अशी उद्दिष्टे या कार्यालयाच्या माध्यमातून साध्य करण्यात येणार आहे.