जेवढे चेंडू बॅटला लागतील तेवढ्या बाईक देईन; अख्तरचं चॅलेंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shoaib akhtar

जेवढे चेंडू बॅटला लागतील तेवढ्या बाईक देईन; अख्तरचं चॅलेंज

आपल्या गोलंदाजीच्या गतीमुळे रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एकाला चॅलेंज दिले आहे. एका ओव्हमध्ये जेवढ्या चेंडूला बॅट लावून दाखवशील तेवढ्या बाईक देईन, असे आव्हान त्याने बुखारी यांना दिले आहे. हा चॅलेंजिगचा खेळ काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने केलेल्या ट्विटच्या माध्यमातून सुरु झाला. यात आता आणखी एक वळण आले आहे. अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता फहाद मुस्तफा याला चॅलेंज दिले होते. एक ओव्हर खेळून दाखवली तर बाईक तुझी, असे ट्विट शोएब अख्तरने केले होते. यावर अभिनेता फवाद मुस्तफाने शोएबला कोणतेही उत्तर दिलेले नाही. (former pakistan bowler shoaib akhtar challenges actor fahad mustafa to face him)

मात्र या सामन्यात आता सैय्यद जुल्फिकार बुखारी यांनी एन्ट्री मारली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात स्पेशल असिस्टंट राहिलेल्या बुखारी यांनी शोएब आणि अभिनेता फहाद मुस्तफा यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीत सहभाग घेतलाय. बुखारीने ट्विटच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिलीये. शोएब अख्तरचे चॅलेंज स्विकारत असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे शोएब अख्तरला आश्चर्याचा धक्का बसलाय. सर्व काही ठिक आहे ना? असा प्रश्न उपस्थित करत एक चॅलेंजर आणखी आला! असे ट्विट अख्तरने केले आहे.

हेही वाचा: लढवय्यी नाओमी ड्रिप्रेशनलाही हरवेल!

अख्तर बुखारी यांच्यातील ट्विटरवरील जुगलबंदी चांगली रंगली. अख्तरच्या प्रतिक्रियेनंतर सर्व काही ठिक आहे मित्रा. मी तुझे (अख्तर) जेवढे चेंडू मिस करेन तेवढ्या बाईक देईन, असा टोला बुखाही यांनी लगावला. शाब्दिक खेळात अख्तरने गंभीरचे नाव ओढल्याचेही पाहायला मिळाले. "वाह ये गंभीर होता जा रहा है!" जर अशी गोष्ट असेल तर माझ्या जेवढ्या चेंडूंना बॅट जरी लावलीस तरी तेवढ्या बाईक देईन, असे अख्तरने म्हटले आहे.

हेही वाचा: कोहली-शास्त्रींची व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकली का?

क्रिकेटच्या मैदानात विरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यातील सामना पाहण्याजोगा असायचा. दोघांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्यात मजेशीर सामना रंगल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता शोएब-बुखारी यांच्यात सोशल मीडियावर रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळते आहे. या सामन्याचे पुढे काय होणार हे माहित नाही. पण सध्याच्या घडीला ट्विटरवरील दोघांच्या बोलंदाजीमुळे क्रिकेट प्रेमींचे चांगलेच मनोरंजन होताना दिसते हे मात्र खरे.