

Esha Singh Claims Gold and Manu Bhaker Takes Bronze | ISSF World Cup 2026
Sakal
Shooting World Cup India: चीनमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वकरंडकात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दोन खेळाडूंनी पदकांवर मोहर उमटवली. ईशा सिंग हिने सुवर्णपदकावर नाव कोरले, तर ऑलिंपिक पदकविजेती मनू भाकर हिने ब्राँझ पटकावले. चीनच्या झँग यूईयू हिने रौप्यपदक जिंकले.