जागतिक स्पर्धेत चौथी, दिल्लीत विक्रम

तेहाय गेमेचू दिल्ली अर्ध मॅरेथॉन पूर्ण करताना
तेहाय गेमेचू दिल्ली अर्ध मॅरेथॉन पूर्ण करताना

नवी दिल्ली : इथिओपियाच्या तेहाय गेमेचू हिने दिल्ली अर्धमॅरेथॉन स्पर्धा विक्रमासह जिंकली. जागतिक स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत चौथी आलेली गेमेचू विक्रम करीत असताना तिच्या देशाचाच तसेच पुरुषांची स्पर्धा जिंकलेला एडामलाक अंतिम रेषेजवळ होता.

गेमेचूने एका वर्षापूर्वीची आपली वेळ 50 सेकंदांनी कमी करताना एक तास सहा मिनिटे वेळ दिली. तिने अखेरच्या पाच किलोमीटरमध्ये इथिओपियाच्याच येलामजेर्फ येहुआलाव हिला पराजित केले. या अखेरच्या टप्प्यात येहूआलाव आघाडीवर होती, पण गेमेचूने अखेरचे काही मीटर असताना वेग वाढवत विजेतेपद राखले. दोहातील अपयश दिल्लीत स्पर्धा विक्रम करून काही प्रमाणात भरून काढले असे गेमेचूने सांगितले.

एडामलांकने महिलांची विजेती पूर्ण करण्यापूर्वी सात मिनिटे म्हणजेच 59.10 मिनिटात 21 किलोमटीर पार केले होते. तोही गतविजेता होता. त्याने आपल्या कामगिरीत आठ सेकंदाने सुधारणा केली. त्याचा स्पर्धा विक्रम 5 सेकंदाने हुकला. तीन किलोमीटर असताना अचानक पाठीत दुखायला लागले, त्यामुळे स्पर्धा विक्रमपासून दूर राहावे लागले.

भारतीय गटात स्रीनू बुगाथा अव्वल आला. त्याने 1 तास 4.33 मिनिटे वेळ दिली. त्याने चुरशीच्या शर्यतीत सुरेश पटेल आणि हर्षद म्हात्रेला मागे टाकले. पुरेसे आव्हान नसल्याने आपला स्पर्धा विक्रम हुकला असे स्रीनूने सांगितले. भारतीय महिलांमध्ये एल. सुरिया अव्वल आली. तिची वेळ 1 तास 12.49 मिनिटे अशी होती. या स्पर्धेत एकंदर 40 हजार धावपटू सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com