'काना मागून आली नी तिखट झाली'; चेक प्रजासत्ताकची कहाणी

युरो कप स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरीने लक्षवेधून घेतलेल्या फ्रँक डी बोर यांच्या मार्गदर्शनाखालील नेदरलँडला त्यांच्यापेक्षा कमकुवत समजल्या जाणाऱ्या चेक प्रजासत्ताकने दणका दिला.
Netherlands vs Czech Republic
Netherlands vs Czech RepublicTwitter

Euro 2020 Netherlands vs Czech Republic : युरो कप स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरीने लक्षवेधून घेतलेल्या फ्रँक डी बोर यांच्या मार्गदर्शनाखालील नेदरलँडला त्यांच्यापेक्षा कमकुवत समजल्या जाणाऱ्या चेक प्रजासत्ताकने दणका दिला. बाद फेरीतील तिसऱ्या सामन्यात नेदरलँडचे पारडे जड मानलं जात होतं. एका खेळाडूला 'रेड कार्ड' मिळाल्यानंतर 10 मॅन नेदरलँडला चेक प्रजासत्ताकने 2-0 असे नमवत उपांत्य फेरी गाठली. 'ड' गटात एकमेव सामना जिंकून बाद फेरीत पोहचलेल्या चेक प्रजासत्ताकने 'क' गटातून निर्विवाद यश मिळवलेल्या (तिन्ही सामने जिंकलेल्या) नेदरलँडच्या संघाला पराभवाचा दणका दिला. चेक प्रजासत्ताकची टीम 'कानामागून आली नी तिखट झाली!' असाच काहीसा प्रकार तिसऱ्या सामन्यात पाहायला मिळाला. (Euro 2020 Netherlands vs Czech Republic Round of 16 Holes Schick on scoresheet as Czech move into quarters)

Netherlands vs Czech Republic
मॅच इटलीनं अन् नेटकऱ्यांची मनं ऑस्ट्रियाच्या या ब्युटीनं जिंकली!

पहिल्या हाफमध्ये नेदरलँडला गोलशून्य बरोबरीत रोखून चेक प्रजासत्ताकने कडवी झुंज देण्यास सक्षम असल्याचे संकेत दिले. नेदरलँडची आक्रमण थोपवून त्यांनी पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत ठेवला. दुसऱ्या हाफमधील 55 व्या मिनिटाला नेदलँडचा डिफेंडर मॅथिज डे लिग्टला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला चॅलेंज देण महागात पडलं. त्याला रेड कार्ड मिळाल्यानंतर संघावर 10 खेळाडूनिशी खेळण्याची वेळ आली. याचा चेक प्रजासत्ताकने फायदा उठवला. 68 व्या मिनिटाला थॉमस वोल्सनं गोल डागत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखरच्या क्षणात 80 व्या मिनिटाला चेक प्रजासत्ताकचा स्टार खेळाडू पॅट्रिक शीकने दुसरा गोल डागला.

डॅनिश फुटबॉल संघाला पराभूत केल्यानंतर आता पुढच्या फेरीत चेक प्रजासत्ताकसमोर दुसऱ्या डॅनिश म्हणजेच डेन्मार्कसोबत भिडणार आहे. शनिवारी 3 जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार 9 वाजून 30 मिनिटांनी या दोन झुंजारु संघातील सामना पाहायला मिळेल. क्वार्टरफायनलमधून सेमी फायनलमध्ये धडक मारण्यात कोणत्या संघाला यश येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. साखळी सामन्यात डेन्मार्क आणि चेक प्रजासत्ताक यांची कहाणी सेम टू सेम होती. दोन्ही संघानी दोन पराभव आणि एक विजय नोंदवत बाद फेरी गाठली. त्यानंतर डेन्मार्कने वेल्सला तर चेक प्रजासत्ताकने नेदरलँडला दणका देत स्पर्धेत आगेकूच कायम राखली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com