esakal | EURO 2020 : इटली भारी; पण तुर्कीचीही कहाणी न्यारीच!
sakal

बोलून बातमी शोधा

Italy vs Turkey

EURO 2020 : इटली भारी; पण तुर्कीचीही कहाणी न्यारीच!

sakal_logo
By
सुशांत जाधव

EURO 2020 : कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली युरोपातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात होतेय. युरोपात फुटबॉलचा दबदबा पाहायला मिळतो. 24 संघांनी यंदाच्या स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 प्रमाणे 6 ग्रुमध्ये वर्गवारी करुन या स्पर्धेला सुरुवात होते. इटली आणि तुर्की यांच्यात सलामीची लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांना 12.30 AM म्हणजेच मध्यपात्रीपासून हा सामन्याचा आनंद घेता येईल.

ग्रुप ए मध्ये इटली हा बलाढ्य़ संघ आहे. चारवेळच्या वर्ल्ड चॅम्पियन संघाने 1968 मध्ये पहिली आणि अखेरची युरो ट्रॉफी जिंकली होती. 50 वर्षांपेक्षा अधिक काळचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने इटलीचा संघ मैदानात उतरेल. या संघात युवा आणि अनुभव याचा सुरेख मेळ पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला तुर्की संघ स्पर्धेत उलथा पालथ करुन धक्कादायक निकालाची नोंद करण्याची क्षमता असणारा संघ आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात अटितटीचा सामना पाहायला मिळेल यात शंका नाही.

हेही वाचा: वातावरण टाईट करणाऱ्या फ्लिंटॉप-युवी फाईटची अनटोल्ड स्टोरी

इटलीकडे जॉर्जीनिओ आणि मार्को वेराट्टीच्या रुपात दोन सर्वोत्तम डिफेंन्सिव मिडफिल्डर आहेत. गोलकिपर जियनलुइजी डोन्नारम्मा सातत्यकामगिरी करत असून याचा संघाला फायदा निश्चितच होईल. मिडफील्डला लोरेंझो पेल्लाग्रीनीला साथ देण्यासाठी युवा प्रतिभावंतांचा भरणा संघात आहे. आक्रमणासाठी बेलोट्टी, इमोबिले आणि इनसीनिए यांना रोखण्याचे मोठे आव्हान प्रतिस्पर्धी डिफेंन्ससमोर निश्चितच असेल.

दुसऱ्या बाजूला हकन चल्हानोलु, जेंगिस उंडर आणि ओझानन तुफान या मिडफिल्डरच्या जोरावर तुर्की कोणत्याही प्रतिस्पर्धी संघास तगडी फाईट देण्यास सक्षम दिसते. डिफेंन्समध्ये ओझान कबक आणि कॅग्लर सोयुंजु जोडीच्या खेळावरही लक्ष असेल. बुराक यिल्माज याने नेमार-एम्बापेसमोर 21 गोल मारुन दाखवले होते. त्यामुळे त्याच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Copa America : ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचं कमबॅक

इटलीचा संघ

फॉरवर्ड्स : आंद्रेया बेलोट्टी, डॉमेनिको बेरार्डी, फॅडेरिको बर्नादेस्की, फॅडेरिको कीएजा, चिरो इमोबिले, लोरेंझो इनसीनिए, जाकोमो रस्पदोरी.

मिडफील्डर्स : निकोलो बरेल्ला, ब्रायन क्रिस्तांत, जॉर्जीनिओ, मॅनुएल लोकाटेली, लोरेंझो पेल्लाग्रीनी, स्टेफानो सेंसी, मार्को वेराट्टी.

डिफेंडर्स : फ्रांसेस्को सेरबी, अलेसांद्रो बास्तोनी, लियोनार्डो बोनुच्ची, जॉजीओ किलीनी, जियोवानी डि लोरेंझो, एमर्सन पल्मीएरी, आलेसांद्रो फ्लोरेंजी, लियोनार्डो स्पिनाझ्झोला, रफाएल तोलोए.

गोलकीपर्स : जानलुइजी डोन्नारुम्मा, एलेक्स मेरेट, सल्वातोर सिरिगु.

मॅनेजर-रॉबर्तो मॅन्चिनी

तुर्कीचा संघ

फॉरवर्ड्स : बुराक यिल्माझ, जेंगिस उंडर, एनस उनल, अब्दुलकादिर ओमर, करेम अक्तुर्गुल, हलिल इब्राहिम देरविसोगुल, कीनन कारामन.

मिडफील्डर्स : डोरुखान टोकोझ, इरफान जान काहवेजी, ओकाय योकुस्लु, ओरकुन कोकचु, ओझान तुफान, तायलान अंताल्यला, हकन चल्हानोलु, युसुफ याझिझि.

डिफेंडर्स : झेकी चेलिक, मेर्ट मुल्डुर, मेरिह डेमिरल, ओझान कबक, चालर सोयुंजु, कान अयहान, उमुत मेरास, रिदवान यिल्माझ.

गोलकीपर्स : मेर्ट गोनुक, उरजान चेकर, अल्तय बेयंदर.

मॅनेजर- शेनोल गुनेश