esakal | वातावरण टाईट करणाऱ्या फ्लिंटॉप-युवी फाईटची अनटोल्ड स्टोरी
sakal

बोलून बातमी शोधा

 yuvraj singh

वातावरण टाईट करणाऱ्या फ्लिंटॉप-युवी फाईटची अनटोल्ड स्टोरी

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने 2019 च्या वर्ल्ड कपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने क्रिकेटला अलविदा केले असले तरी त्याच्या अफलातून आणि अविस्मरणी खेळ क्रिकेट चाहत्याला आजही आठवतात. 2007 च्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूवर सहा षटकार मारण्याचा क्षण क्रिकेट चाहत्याला आजही लक्षात असेल. या मॅचमध्ये युवी आणि अँड्रू फ्लिंटॉप यांच्यात बाचाबाची झाली होती. फ्लिंटॉपवरचा सगळा राग युवीने त्यावेळी नुकतेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या ब्रॉडवर काढला होता, असेच चित्र पाहायला मिळाले होते. (yuvraj-reveals-what-reply-he-gave-to-andrew-flintoff-in-famous-fight-during-2007-world-cup)

हेही वाचा: SL vs IND आतापर्यंत जे घडलं नाही ते द्रविड करुन दाखवणार

या घटनेला आता बारा-तेरा वर्षे उलटून गेली आहेत. फ्लिटॉप आणि युवीमध्ये नेमक काय झालं? आणि तो अँड्रू फ्लिंटॉपला काय म्हणाला? असा प्रश्न आजही काही चाहत्यांना पडतो. या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात षटकारांची बरसात करण्यापूर्वी युवी आणि अँड्रू फ्लिंटॉप यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. युवराज एवढा त्याच्यावर भडकला की, तो चक्क बॅट घेऊन तो स्वेअर लेगला उभ्या असलेल्या फ्लिंटॉपकडे तावातावाने अंगावर गेला. नॉन-स्ट्राइकर असलेला धोनी आणि पंचांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले.

हेही वाचा: युवीच्या स्वप्नाआड आला धोनी!

गौरव कपूरच्या एका पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या युवीने या प्रकरणात नेमक काय झाले होते, यावर भाष्य केले. युवी म्हणाला की. मला आठवतंय त्या मॅचध्ये फ्लिंटॉफला मी सलग दोन चौकार खेचले होते. ही गोष्ट त्याला आवडली नसणार हे सहाजिकच आहे. इकडे ये तुझे मानगुड मोडेन, अशा आशयाचे वक्तव्य फ्लिंटॉपने युवीला उद्देशून केले होते. यावर युवराज भडकला. मी बॅटने कुठे वार करेन माहितेय का? असा रिप्लाय युवीने दिला होता.