
पुण्याची २१ वर्षांची श्रेयसी जोशी हिने स्केटिंग विश्वात तिरंगा मानानं फडकावला आहे. नुकतीच तिने कोरियात झालेल्या आशिया रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकून इतिहास घडवला. ही कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होतंय. तिची बहीण स्वराली ही देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंग करते.
अपार मेहनत, जिद्द आणि स्वप्नांचा दिशेने धावताना या दोघी बहिणी स्केटिंगमधील भारताचा युवा चेहरा आहेत. श्रेयसीने स्केटिंगमध्ये नवा इतिहास रचत अनेकांचं लक्ष या खेळाकडेही वळवलं आहे. तिच्याशी तिच्या या प्रवासाबाबत ईसकाळने साधलेला हा संवाद...