फाफ डुप्लेसीसने दिला साउथ आफ्रिकेच्या कॅप्टनशिपचा राजीनामा!

वृत्तसंस्था
Monday, 17 February 2020

गेले १२ महिने डुप्लेसीससाठी खडतर राहिले आहेत. २०१९ची आयसीसी वर्ल्डकप टुर्नामेंटमध्ये डुप्लेसीसच्या कॅप्टनशिपमध्ये आफ्रिकेची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. पहिल्या सात मॅचपैकी फक्त एकाच मॅचमध्ये त्यांना विजय मिळवता आला होता.

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीसने कसोटी आणि ट्‌वेंटी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. "नवोदित खेळाडूंना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी मी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे' असे त्याने सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल डुप्लेसीसने क्रिकेट मंडळाचे आभार मानले. आता नेतृत्वपदासाठी यष्टिरक्षक फलंदाज क्विंटॉन डीकॉकला अधिक पसंती असेल. 

- भारताचा उसेन बोल्ट श्रीनिवासाने नाकारली क्रीडामंत्र्यांची 'ती' ऑफर

डुप्लेसीस अनुपलब्ध असताना डिकॉकने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिका आणि भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे डुप्लेसीसच्या राजीनाम्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सूत्र डी-कॉककडे सोपविली जाणार यात शंका नाही. 

नेतृत्वाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे मला गेल्या काही दिवसांपासून जाणवत होते; मात्र हा निर्णय सर्वांत कठीण होता. या प्रवासात काही आनंदाचे क्षण आले, तर काही खडतर होते, परंतु माझ्यासाठी खेळाडू म्हणून हा अनुभव नेहमी चांगलाच राहिलेला आहे. कॅप्टनशिप सोडणं हा सर्वात कठीण निर्णय होता, पण क्विंटनला मदत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे डुप्लेसीने सांगितले. 

- डिव्हिलिअर्सच्या जबऱ्या फॅनने बघा काय केलंय; सोशल मीडियात फोटो होतोय तुफान व्हायरल!

दरम्यान, २०१३ मध्ये डुप्लेसीस दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघाचा कॅप्टन बनला. एबी डिव्हिलिअर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर सप्टेंबर २०१७मध्ये तो वनडेचा कॅप्टनही झाला. त्याच्या कॅप्टनशिपमध्ये आफ्रिकेने २०१४ मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. पण त्यांना तेथे पराभूत पत्करावा लागला होता. 

मात्र, गेले १२ महिने डुप्लेसीससाठी खडतर राहिले आहेत. २०१९ची आयसीसी वर्ल्डकप टुर्नामेंटमध्ये डुप्लेसीसच्या कॅप्टनशिपमध्ये आफ्रिकेची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. पहिल्या सात मॅचपैकी फक्त एकाच मॅचमध्ये त्यांना विजय मिळवता आला होता. 

- #ABDevilliers:डिव्हिलिअर्सच्या चाहत्यांना गुड न्यूज; 'या' स्पर्धेत करणार 'कम बॅक'

त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधूनही वगळण्यात आलं होतं. तेव्हा डी-कॉकने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली. टेस्ट सीरिजमध्ये आफ्रिकेने घरच्या मैदानावर श्रीलंका आणि भारताकडून मार खाल्ला. त्यावेळी त्याच्या बॅटिंग फॉर्मवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे तो नाराज झाला होता. 

डुप्लेसीसने ३६ कसोटी, ३९ वनडे आणि ४० टी-२० मॅचेसमध्ये आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी आफ्रिकेने १८ कसोटी, २८ वनडे आणि २५ टी-२० मॅच जिंकल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Faf du Plessis steps down as South Africa ODI and T20I captain