
नवी दिल्ली : बनावट जन्मदाखला सादर केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती संघटनेकडून ११ कुस्तीपटूंना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली महानगरपालिकेकडून ११० कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही चूक झाली नसल्याचे कळवण्यात आल्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेकडून कुस्तीपटूंच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.