
Japan Deports 22 Fake Pakistan Football Players Arrested After Landing in Pakistan
Esakal
पाकिस्तानमधून एक बनावट फुटबॉल टीम सामना खेळण्यासाठी थेट जपानला पोहोचली. पण विमानतळावरच त्यांचा पर्दाफाश झाला. तपास अधिकाऱ्यांना शंका येताच त्यांनी अधिक चौकशी केली. जेव्हा ही टीम बनावट असल्याचं समजलं तेव्हा त्यांना विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं. आता हे मानवी तस्करीचं रॅकेट असल्याचं सांगण्यात येत आहे. अवैधरित्या परदेशात पाठवण्यासाठी अशी युक्ती लढवण्यात आली होती. तब्बल २२ जणांना फुटबॉल खेळाडू असल्याचं सांगून जपानला पाठवण्यात आलं होतं. पण विमानतळावरच सगळा प्लॅन फसला.