esakal | टेनिसमध्ये चिंता! `या` खेळाडूला कोरोना; आता जोकोविचचे काय होणार? 

बोलून बातमी शोधा

tennis

अव्वल मानांकित नोवाक जोकोविच अंतिम सामना खेळणार असलेल्या प्रदर्शनीय स्पर्धेत ग्रिगॉर दिमित्रोवला कोरोना झाल्याचे निदान झाल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. आता जोकोविचचीही चाचणी करण्यात येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

टेनिसमध्ये चिंता! `या` खेळाडूला कोरोना; आता जोकोविचचे काय होणार? 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः अव्वल मानांकित नोवाक जोकोविच अंतिम सामना खेळणार असलेल्या प्रदर्शनीय स्पर्धेत ग्रिगॉर दिमित्रोवला कोरोना झाल्याचे निदान झाल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. आता जोकोविचचीही चाचणी करण्यात येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

जागतिक टेनिस क्रमवारीत दिमित्रोव 19 वा मानांकित आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये त्याने तीनदा उपांत्य फेरीपर्यंत मजली मारली आहे. अव्वल टेनिस खेळाडूत तो गणला जातो. आपल्याला कोरोना झाल्याचे त्याने जाहीर केले. यूएस ओपन सुरू होण्याच्या अगोदर ही घडना घडलेली असली, तरी यूएस ओपन ठरलेल्या कार्यक्रमानुसार खेळवण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. 

चिंताजनक ! नवी मुंबईतील 'ही' चार ठिकाणं ठरतायेत कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

दिमित्रोव कोरोनाबाधित झाला, हे वृत्त धक्का देणारे आहे. आता प्रत्येकाची चाचणी करावी लागेल, असे जोकोविचचे प्रशिक्षक असलेला माजी विम्बल्डनविजेता गोरान इवानसेविकने सांगितले. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने सावध व्हावे आणि चाचणी करावी म्हणून मी ही बातमी उघड केली आहे, असे दिमित्रोव म्हणाला. मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, अशीही भावना दिमित्रोवने व्यक्त केली. 

टेनिसच्या पुनरागमनासाठी जोकोविचने अद्रिया येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनीय सामन्यातही दिमित्रोव खेळला होता. त्या प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आल्याची टीकाही या प्रदर्शनीय स्पर्धेनंतर करण्यात आली होती.

बल्गेरियातील त्या स्पर्धेत प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाबाधित काही रुग्ण सापडूनही सर्बिया सरकारने लॉकडाऊनचे सर्व निर्बंध खुले केले आहेत. 

अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन, 'या' तारखेपर्यंत सर्वकाही बंद

जोकोविचचा अंतिम सामना रशियाच्या रुब्लेवविरुद्ध होणार आहे. जोकोविचसह या प्रदर्शनीय स्पर्धेत डॉमनिक थिम अलेक्‍झांडर रुब्लेवही सहभागी झाले होते. सुरक्षिततेचे सर्व नियम आम्ही पाळले होते. सर्बिया सरकारने आखून दिलेले सर्व नियम आम्ही अंमलात आणले होते, तरीसुद्धा एक खेळाडू कोरोनाबाधित झाला, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पर्धा संचालक जॉर्तजे जोकोविच यांनी सांगितले. जॉर्तजे हे नोवाक जोकोविचचे मोठे बंधू आहेत.

famous tennis player is corona positive read full story