lockdown
lockdown

अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन, 'या' तारखेपर्यंत सर्वकाही बंद

Published on

अंबरनाथ : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबरनाथ नगरपालिकेने प्रशासनातर्फे मंगळावारपासून (ता.22) पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे.          

मागील काही दिवसांत अंबरनाथमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने रुग्णसंख्या हजाराच्या पुढे गेली आहे. तसेच 30 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यातच लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागल्याने या सर्वाला आळा बसावा यासाठी अंबरनाथ शहर पुन्हा पुढील दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी जगदसिंग गिरासे यांच्याकडे केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार (ता.23) पासून सोमवार (ता.30) पर्यंत शहरातील दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच दूध , भाजीपाला या सेवा घरपोच सुरु राहणार आहेत.

Lockdown once again in Ambernath, everything closed till the date

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com