Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Priya Ghanghas wins gold Commonwealth Games 2026: २२ वर्षीय प्रिया घंघास हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्याच मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारतीय बॉक्सिंगला आणखी एक अभिमानाचा क्षण दिला.
Priya Ghanghas wins gold Commonwealth Games 2026

Priya Ghanghas wins gold Commonwealth Games 2026

esakal

Updated on

India's Priya Ghanghas beats Marie-Bathoul Al-Ahmadieh: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंगपटूंनी पदकाचे सत्र सुरू ठेवले... २ सुवर्ण आणि एक रौप्यपदकानंतर भारताच्या बॉक्सर्सनी रात्रीच्या सत्रात पदकांची भर घातली. सकाळच्या सत्रात प्रीती पवार व जैस्मिन लम्बोरिया यांनी अनुक्रमे ५४ व ५७ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात जादुमणी सिंगला रौप्यवर समाधान मानावे लागले. त्यानंतर साक्षी चौधरीने रात्रीच्या सत्रातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर २२ वर्षीय प्रिया घंघासने ( Priya Ghanghas) ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com