मुंबईच्या 'या' गोलंदाजाचा डेब्यू सर्व बटालियनने प्रोजेक्टरवर पहिला, VIDEO | Father saw the match by putting a projector on my debut Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Father saw the match by putting a projector on my debut Kumar Kartikeya
मुंबईच्या 'या' गोलंदाजाचा डेब्यू सर्व बटालियनने प्रोजेक्टरवर पहिला, VIDEO

VIDEO मुंबईच्या 'या' गोलंदाजाचा डेब्यू सर्व बटालियनने प्रोजेक्टरवर पहिला

मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 11 मॅच खेळणाऱ्या मुंबई संघाला यंदा केवळ 2 मॅजवर कब्जा मिळवता आला आहे. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणारा 15 व्या सीझनमध्ये फ्लॉप ठरला असला तरी संघातील नव्या खेळाडूंची चर्चा क्रिकेट जगतात अधिक रंगली आहे. विशेष म्हणजे, स्पिनर कुमार कार्तिकेय सिंह(spinner Kumar Kartikeya). याने आपल्या पदार्पणासंदर्भात एक खुलासा केला आहे.

मुंबईचा स्पिनर कुमार कार्तिकेयचे वडील पोलिस आहेत. कार्तिकेयने खुलासा केला आहे की, त्याच्या वडिलांच्या संपूर्ण बटालियनने (पोलिस कर्मचारी) प्रोजेक्टरवर त्याचा आयपीएल पदार्पण सामना पाहिला. तो म्हणाला, जेव्हा मी पहिली विकेट घेतली. तर माझ्या वडीलांचे सर्वांनी उभे राहत टाळ्या वाजवून अभिनंदन केले. आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यांनी जेव्हा हा व्हिडीओ मला पाठवला तेव्हा माझा आनंद गगनात मावेना. असे कार्तिकेयने म्हटले आहे.

हेही वाचा: बसमध्ये पाँटिंगची एंट्री होताच, दिल्लीच्या खेळाडूंनी गायले ‘सैयाँ’, VIDEO

मुंबई इंडियन्सने आपल्या इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्तिकेयने आपल्या पदार्पणसंदर्भात एक किस्सा केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, माझ्या पादर्पणादिवशी वडिलांना मी खेळत असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यांनी संपूर्ण बटालियनला मी खेळत असल्याचे कळवलं.

माझा पहिला आयपीएल सामना पाहण्यासाठी त्यांनी प्रोजक्टर लावला अन् माझी पहिली मॅच त्यांनी पाहिली. जेव्हा मी विकेट घेतली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवत माझ्या वडिलांचे अभिनंदन केले आणि आनंदाने त्यांची गळाभेट घेतली. त्यावेळी मला खुप अभिमानास्पद वाटलं. कारण मी माझ्या वडिलांना हसताना पाहिलं. अशी भावना कार्तिकेयनने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: मुंबईकडून अपमानित होण्याची चेन्नईला जडली सवय; पाहा आकडेवारी काय सांगतेय?

तसेच कार्तिकयने डेब्यूवेळी रोहित शर्मा सोबत झालेल्या चर्चासंदर्भातही भाष्य केले. कार्तिकेय म्हणाला, जेव्हा मला गोलंदाजी करायची होती तेव्हा रोहितने मला बॉल दिला. त्यांनी कोणतीच शंका न घेता माझ्यावर गोलंदाजीची जबाबदारी दिली आणि केवळ सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तेव्हा मी निर्भीडपणे गोलंदाजी केली.

Web Title: Father Saw The Match By Putting A Projector On My Debut Kumar Kartikeya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLMumbai IndiansIPL 2022
go to top