
मुंबईकडून अपमानित होण्याची चेन्नईला जडली सवय; पाहा आकडेवारी काय सांगतेय?
मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) याच्यातील आयपीएल (IPL) सामना म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत रोमांच असे चित्र असते. मात्र आज वानखेडेवर (Wankhede) झालेल्या सामन्यात मात्र वेगळेच चित्र दिसले. सामन्याच्या सुरूवातीलाच बत्ती गुल झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच मुंबईने कधी नाणेफेक जिंकली आणि चेन्नईची 3 बाद 5 धावा अशी दयनीय अवस्था कधी करून टाकली हे कळालेच नाही. यानंतर चेन्नईला डाव सावरताच आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ 97 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा: MI vs CSK : रोहितने वाढदिवसादिवशीच पोलार्डला वगळले
विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जची ही आयपीएल इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या (Chennai Super Kings lowest totals In IPL History) नाही. यापूर्वी 2013 ला वानखेडेवरच मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात चेन्नईचा संपूर्ण संघ 79 धावात तंबूत परतला होता. त्यानंतर आज वानखेडेवरच मुंबईनेच चेन्नईला 97 धावात गुंडाळले. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात देखील चेन्नईला फक्त 109 धावा करता आल्या होत्या. तर 2019 मध्ये मुंबईने चेन्नईच्या घरात घुसून त्यांची दयनीय अवस्था केली होती. मुंबईने चेपॉकच्या स्टेडियमवर चेन्नईला 109 धावात गुंडळाले होते.
हेही वाचा: वानखेडेची बत्ती गुल, चेन्नई DRS ला मुकली; अंबानींचे मीम्स व्हायरल
या सर्व आकडेवारीवर नजर टाकली तर चेन्नईला स्वस्तात गुंडाळण्यात मुंबईचा हातखंडा आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात मुंबईचा वेगावान गोलंदाज डॅनियल सॅम्सने चेन्नईची टॉप ऑर्डर उडवली. त्याने 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट घेतल्या. दरम्यान, 3 बाद 5 धावांवरून चेन्नईच्या मधल्या फलंदाजीने डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र रायुडू 10, शिवम दुबे 10 आणि ब्राव्हो 12 धावा करून परतले. संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शेवटपर्यंत फलंदाजी करत 33 चेंडूत 36 धावा केल्या. त्यामुळे चेन्नई निदान शंभरच्या जवळ जाऊ शकली. मुंबईकडून कुमार कार्तिकेय आणि रिले मॅरेडिथ यांनी प्रत्येकी 2 तर रमनदीप सिंह आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Web Title: Chennai Super Kings Lowest Totals In Ipl History Against Mumbai Indians
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..