व्यावसायिक बॉक्‍सिंग लढतीत सरिताची सलामी सोफियाशी 

पीटीआय
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नवी दिल्ली - भारताची माजी जगज्जेती महिला बॉक्‍सर एल. सरिता देवी व्यावसायिक गटातील पदार्पणाच्या लढतीत हंगेरीच्या सोफिया बेशी हिच्याशी खेळणार आहे. ही लढत तिच्याच शहरात म्हणजे इंफाळ येथे 29 जानेवारीस होणार आहे. 

हौशी विभागातून जगज्जेतेपदाबरोबर आशियाई विजेतेपदही मिळविणाऱ्या सरिताने अलीकडेच व्यावसायिक बॉक्‍सर होण्याचा निर्णय घेतला होता. व्यावसायिक गटातून खेळणारी ती भारताची पहिली महिला बॉक्‍सर आहे. 

पहिल्याच लढतीत तिच्यासमोर 59 लढतींचा अनुभव असलेल्या हंगेरीच्या सोफिया बेड हिच्याशी पडणार आहेत. या कारकिर्दीत 29 वर्षीय सोफियाने 19 विजय मिळविले आहेत. व्यावसायिक गटातील कारकिर्दीसाठी सरिता अमेरिकेच्या ज्यो क्‍लॉघ यांचे मार्गदर्शन घेत आहेत. क्‍लॉघ हे महान बॉक्‍सिंग खेळाडू महंमद अली यांच्या प्रशिक्षक टीमधील एक असून, त्यांनी इव्हॅंडर होलिफिल्ड यालाही मार्गदर्शन केले आहे. 

सरिता म्हणाली, ""व्यावसायिक बॉक्‍सर होण्यामागे हार-जीत हे उद्दिष्ट नाही. कारकिर्दीमधील एक नवी मोहीम म्हणून मी या कारकिर्दीकडे बघत आहे. त्यामुळेच पदार्पणाच्या लढतीतच मी अनुभवी प्रतिस्पर्धीच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. एक यशस्वी आणि अनुभवी बॉक्‍सर म्हणून मला आता कारकीर्द घडवायची आहे.''

Web Title: Female boxer L. Sarita Devi