

Vipraj Nigam Assault Allegation Case
ESakal
एका महिला क्रिकेटपटूने उत्तर प्रदेशातील एका आयपीएल खेळाडूवर लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या पीडितेने सुरुवातीला नोएडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु, कोणतीही कारवाई न झाल्याने ती लखनऊ पोलिस मुख्यालयात गेली आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.