
जगातला नंबर वन बुद्धिबळपट्टू मॅग्नस कार्लसनला जीन्स घातल्यानं फिडेनं ब्लिट्झ चॅम्पियनशिपमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण फिडेच्या अधिकाऱ्यांनी चर्चेनंतर कार्लसनला खेळण्यास परवानगी देताना नियमात बदल केला आहे. मात्र, फिडेच्या भूमिकेवर आणि विशेषत: उपाध्यक्ष असलेल्या विश्वनाथ आनंदवर कार्लसनने जोरदार टीका केलीय. ड्रेस कोडच्या नियमाचं उल्लंघन केल्याचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला. विश्वनाथ आनंदसह इतर अधिकाऱ्यांनी वेळेसोबत बदल स्वीकारले नाहीत आणि फिडेने जी भूमिका घेतलीय ती स्वीकारण्यास भारताचा महान खेळाडू तयार नसल्याचं कार्लनस म्हणाला.