
सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. आर. प्रज्ञानंद याला २७८५ एलो रेटिंगची कमाई करता आलेली आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा २८३९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे.