

- अनुपमा गोखले
भारतीय आव्हानवीर डी. गुकेश आणि चीनचा विश्वविजेता डिंग लिरेन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील नववा डावही बरोबरीत सुटला आणि या लढतीतील समान गुणांची कोंडी या फेरीतही न फुटता कायम राहिली.
नववा डाव बोगो इंडियन पद्धतीने सुरू झाला आणि लवकरच कॅटलान पद्धतीच्या अंगाने गेला. कॅटलान पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खेळीला असणारे भरपूर पर्याय आणि गुंतागुंतीचा खेळ!