उपविजेत्यांची पाटी कोरीच; मोरॉक्कोविरूद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत| FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Group F Morocco Vs Croatia

FIFA World Cup 2022 : उपविजेत्यांची पाटी कोरीच; मोरॉक्कोविरूद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत

FIFA World Cup 2022 Group F Morocco Vs Croatia : रशियात 2018 मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाने अंतिम फेरीत धकड मारत इतिहास रचला होता. मात्र गतवेळच्या उपविजेत्यांना यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोरॉक्कोविरूद्ध एकही गोल करता आला नाही. त्यांचा कर्णधार ल्युका मॉड्रीचची जादू आजच्या सामन्यात काही चालली नाही. ग्रुप F मधील क्रोएशिया आणि मोरॉक्को सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : कतारमधील वर्ल्डकपसाठी Adidas ने तयार केलेला 'अल रिहला' बॉल आहे खूप खास

पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत

गतवेळच्या वर्ल्डकपचा उपविजेता क्रोएशिया आणि मोरॉक्को यांच्यात फिफावर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लढत झाली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी संथ सुरूवात करत एकमेकांना चाचपूण पाहण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मोरॉक्कोने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. त्याला नंतर क्रोएशियाने देखील प्रतिआक्रमण करत चांगले प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मोरॉक्कोने पहिल्या हाफमध्ये क्रोएशियाच्या गोलपोस्टच्या दिशेने पाच शॉट्स खेळले. मात्र त्यातील एकही ऑन टार्गेट नव्हता.

दरम्यान, क्रोएशियाने देखील मोरॉक्कोच्या गोलपोस्टवर चारवेळा हल्ला चढवला. त्यातील एक अचूक होता मात्र मोरॉक्कोचा गोलकिपर बोनोने हा प्रयत्न हाणून पाडला. क्रोएशियाचा स्टार फुटबॉलर ल्युका मॉड्रिचने फर्स्ट हाफ संपत आला असताना एक जोरदार फटका मारला होता. मात्र हा फटका मोरॉक्कोच्या गोलपोस्टवरून बाहेर गेला. पासिंग आणि बॉल ताब्यात ठेवण्यात दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला.

हेही वाचा: fifa world cup 2022 : विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांच्या वेळा लांबल्या

सेकंड हाफ : उपविजेते कोंडी फोडण्यात अपयशी

दुसऱ्या हाफमध्ये उपविजेत्या क्रोएशियाकडून तुलनेने दुबळ्या मोरॉक्कोविरूद्ध चांगला खेळ करत गोलशूनची कोंडी फोडेल असे वाटले होते. मात्र मोरॉक्कोच्या आक्रमणावर प्रतिआक्रमण करण्यात ल्युका मॉड्रीचचा क्रोएशिया कमी पडला. दुसऱ्या हाफमध्ये मोरॉक्कोने तब्बल 8 वेळा क्रोएशियाच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. त्यातील फक्त 2 शॉट्सच ऑन टार्गेट होते. दुसरीकडे मोरॉक्कोने क्रोएशियाला फक्त 5 वेळा स्वतःच्या गोलपोस्टवर चाल करून जाण्याची संधी दिली. विशेष म्हणजे क्रोएशियाने बॉल आपल्या नियंत्रणात ठेवण्यात आणि पासिंगमध्ये संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले. मात्र तरी देखील त्यांना फक्त दोन शॉट्स ऑन टार्गेट मारता आले.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का