Fifa World Cup 2026: ९२ वर्षानंतर पहिला विजय... इजिप्तसाठी मोहम्मद सलाह हिरो ठरला; संघासाठी वर्ल्ड कपमध्ये नोंदवले सर्वाधिक गोल

Egypt defeat New Zealand 3-1 in World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये इजिप्तने इतिहास रचला आहे. तब्बल ९२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इजिप्तला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय मिळाला. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला इजिप्तचा स्टार फुटबॉलपटू Mohamed Salah.
Egypt to a historic 3-1 victory over New Zealand

Egypt to a historic 3-1 victory over New Zealand

esakal

Updated on

Egypt end 92-year wait for historic World Cup victory: १९३४ मध्ये फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इजिप्तला पहिल्या विजयासाठी ९२ वर्ष वाट पाहावी लागली. वर्ल्ड कपमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात इजिप्तने ०-१ अशी पिछाडी भरून काढताना न्यूझीलंडवर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला. इजिप्तच्या या विजयामुळे G गटातून पुढील फेरीत जाण्याची चुरस अधिक रंगतदार झाली आहे. मोहम्मद सलाहने ( Mohamed Salah) केलेला गोल ऐतिहासिक ठरला. इजिप्तसाठी मोस्ताफा झिको व ट्रेझेगूट यांनीही प्रत्येकी एक गोल केला. इजिप्तने या विजयासह त्यांच्या स्पर्धेतील आशा जीवंत ठेवल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com