An emotional Lionel Messi celebrates after scoring a historic hat-trick
esakal
Argentina vs Algeria FIFA World Cup 2026 match Marathi report : २० वर्षांचा अनुभव घेऊन मैदानावर उतरलेल्या लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) त्याचा करिष्मा दाखवून दिला. ३८ वर्षीय मेस्सीचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असल्याने, तो मैदानावर येताच वातावरण एकदम भावनिक झालेला दिसले. अर्जेंटिनाचे चाहते आपल्या भावनांना अश्रू्ंद्वारे वाट मोकळी करून देताना दिसले. मेस्सीनेही चाहत्यांचा विश्वास कायम राखताना तीन भन्नाट गोल करून फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अर्जेंटिनासाठी गोल करणारा युवा व वयस्कर, खेळाडूचा मान त्याने पटकावला आणि महान फुटबॉलपटू पेले यांचाही विक्रम त्याने मोडला. मेस्सीच्या या करिष्माई हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने ३-० अशा फरकाने अल्जेरियाला नमवले.