FIFA World Cup 2026 Round of 32 qualified teams
esakal
FIFA World Cup 2026 Round of 32 fixtures : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा खरा रंग आता चढणार आहे. साखळी फेरीतील सामने संपायला आले आहेत आणि आता हरेल तो घरी जाईल, अशा बाद फेरीची स्पर्धा सुरू होणार आहे. ३२ संघांच्या जागांसाठीच्या शर्यतीत आतापर्यंत १२ संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. त्यात गतविजेत्या अर्जेंटिनासह ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, मोरोक्को, कॅनडा यांचा सामवेश आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने विजय मिळवला असता तरी त्यांचे स्थान अजूनही पक्के झालेले नाही. पोर्तुगालसह स्पेनचेही गणित एका निकालामुळे बिघडले आहे.