

England vs Argentina | FIFA World Cup 2026
Sakal
FIFA World Cup 2026 Semifinal: Argentina vs England: अर्जेंटिना आणि इंग्लंड हे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आमने-सामने येतात तेव्हा दिएगो मॅराडोना यांच्या हँड ऑफ गॉडची नेहमीच चर्चा होत असते. या स्पर्धेत हे दोन्ही देश उद्या उपांत्य फेरीसाठी एकमेकांविरुद्ध लढत आहेत. हँड ऑफ गॉड या वेळी होणार नसला तरी कोण होणार तारणहार, याची उत्सुकता मात्र आहे.
१९८६ च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात मॅराडोना यांचा हँड ऑफ गॉड भलताच गाजला होता आणि वादग्रस्तही ठरला होता. त्या सामन्यात अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवला होता त्यानंतर दोन स्पर्धांत हे दोन्ही देश आमनेसामने आले. एकदा अर्जेंटिना तर एकदा इंग्लंड विजयी झाले आहेत.