Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली

Spain beat France 2-0 FIFA World Cup semifinal : फिफा वर्ल्ड कप २०२६च्या उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सवर २-० असा दणदणीत विजय मिळवत तब्बल १६ वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Spain beat France 2-0 FIFA World Cup semifinal

Spain beat France 2-0 FIFA World Cup semifinal

esakal

Updated on

Spain qualify for FIFA World Cup 2026 final: स्पेनने फिफा फुटबॉस वर्ल्ड कप २०२६ मध्ये मंगळवारी अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सला २-० ने पराभूत केले. अत्यंत अचूक आणि शिस्तबद्ध खेळ करणाऱ्या स्पेनने १६ वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला. मिकेल ओयार्झाबालने पहिल्या सत्रात पेनल्टीवर केलेल्या गोलने आणि पेद्रो पोरोने दुसऱ्या सत्रात केलेल्या शानदार गोलने स्पेनसाठी हा संस्मरणीय विजय निश्चित केला. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे फ्रान्सचे स्वप्न धुळीस मिळाले. या सामन्यात स्पेनने त्यांच्या 'Tiki-Taka' स्टाईलने फ्रान्सचे आक्रमण सहज थोपवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com