Fifa World Cup 2026: जपानच्या प्रशिक्षकाच्या 'फलका'ची चर्चा; नेदरलँड्सला रडवलं, मॅच होताच असं काही केलं की, ज्याने जिंकली मनं... Video

Hajime Moriyasu uses board during Japan vs Netherlands match : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये जपानने केवळ खेळानेच नव्हे, तर शिस्त आणि संस्कारांनीही जगाची मने जिंकली आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या थरारक सामन्यात शेवटच्या क्षणी बरोबरी साधत जपानने एक महत्त्वाचा गुण मिळवला. मात्र सामन्यानंतर चर्चेचा विषय ठरले ते प्रशिक्षक आणि चाहत्यांचे वर्तन.
Hajime Moriyasu uses board during Japan vs Netherlands match

Hajime Moriyasu uses board during Japan vs Netherlands match

esakal

Updated on

Japan vs Netherlands dramatic draw highlights: जपान संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सला धक्का दिला... अगदी शेवटच्या क्षणी डाएची कमाडाने ( ८८ मि.) गोल करून जपानचा पराभव टाळला अन् डचना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. जपानने या सामन्यांत दोनवेळा पिछाडी भरून काढली. पहिला हाफ गोलशून्य राहिल्यानंतर ५०व्या मिनिटाला व्हिर्जील व्हॅन डीजेकेने नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली आणि त्याला ५७ व्या मिनिटाला जपानच्या केइटो नाकामुराने उत्तर दिले. ६४ व्या मिनिटाला क्रिसेन्सिओच्या गोलने डचना पुन्हा २-१ असे आघाडीवर आणले, परंतु ८८व्या मिनिटाला चमत्कार घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com