Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

Portugal vs DR Congo FIFA World Cup 2026 match report: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. बलाढ्य पोर्तुगालला डीआर काँगोने १-१ अशा बरोबरीत रोखत स्पर्धेत मोठा उलटफेर घडवून आणला. तब्बल ५२ वर्षांनंतर वर्ल्ड कप स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या काँगोने आपल्या जिद्दीच्या जोरावर फुटबॉलविश्वाचे लक्ष वेधून घेतले.
Portugal shocked by DR Congo in FIFA World Cup 2026

Portugal shocked by DR Congo in FIFA World Cup 2026

esakal

Updated on

Portugal vs Congo DR Marathi Football Fifa News: फ्रान्सचा किलियन एमबापे, नॉर्वेचा हालंड अन् अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील बुधवारचा दिवस गाजवल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून तशीच अपेक्षा होती. पण, पोर्तुगालच्या सुपरस्टारची पोकळ हवा राहिली. सहावा वर्ल्ड कप खेळण्याचा विक्रम नावावर करणाऱ्या रोनाल्डोला संघासाठी विजयी गोल करता आला नाही. सहकाऱ्यांनी दोन संधी तयारही केल्या होत्या, परंतु रोनाल्डोने त्या गमावल्या. पहिल्या हाफच्या शेवटच्या सेंकदाला मिळवलेल्या बरोबरीच्या गोलने काँगो डीआरचा आत्मविश्वास उंचावला आणि त्यांनी बलाढ्या पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखून, स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवला. ५२ वर्षानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या काँगोने पहिला गोल व पहिला गुण आजच्या सामन्यात कमावला. पोर्तुगालसाठी हा खूप मोठा धक्का आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com