Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू होण्यापूर्वी व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...

England training gear stolen before FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. कॅन्सस सिटीमध्ये संघाच्या पहिल्या सराव सत्रापूर्वीच चोरट्यांनी त्यांच्या प्रशिक्षण साहित्यावर डल्ला मारला.
England training gear stolen before FIFA World Cup 2026

England training gear stolen before FIFA World Cup 2026

Updated on

Kansas City robbery involving England football team: इंग्लंडचा संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने अमेरिकेत दाखल झाला खरा, परंतु कॅन्सस सिटीमध्ये त्यांना भलताच अनुभव आला. इंग्लंडचे खेळाडू सराव सुरू करण्यापूर्वीच एका व्हॅनमधून त्यांचे मॅच बूट चोरण्यात आले. डेली मेल स्पोर्टच्या वृत्तानुसार, संघातील सर्वात मोठ्या स्टार खेळाडूंचे बूट, अधिकृत स्पर्धेचे चेंडू आणि महत्त्वाचे प्रशिक्षण साहित्य चोरीला गेले आहेत. फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथून इंग्लंडच्या मिसूरीमधील स्वोप सॉकर व्हिलेज येथील सराव सत्राकडे साहित्य नेत असताना ही चोरी झाली. इंग्लंडचा संघ स्वोप सॉकर व्हिलेजमध्ये किमान पुढील तीन आठवडे राहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com