England supporters enjoying the match
sakal
मेक्सिको सिटी - विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू झाली की इंग्लंड संघाचीही चर्चा जोमात सुरू होत असते आणि त्यांची प्रगती होते तसा इंग्लिश चाहत्यांचा उत्साह टिपेला पोहोचतो. या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडचा आता उपउपांत्यपूर्व फेरीत सामना सहयजमान मेक्सिकोशी होत आहे. या सामन्याचे तिकीट हवे असेल, तर इंग्लिश प्रेक्षकांना २,६०० युरो म्हणजेच भारतीय रकमेत तीन लाख ३१ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.