Erling Haaland equals Messi and Mbappe World Cup record
esakal
Erling Haaland equals Messi and Mbappe World Cup record: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील रविवारची मध्यरात्र ब्राझीलच्या चाहत्यांसाठी वेदनादायी ठरली. एर्लिंग हालंडच्या दोन अविश्वसनीय गोलने नॉर्वेला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. आता त्यांच्यासमोर मेक्सिको किंवा इंग्लंड यांच्यापैकी एकाचे आव्हान असणार आहे. हालंडने आजच्या सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली, परंतु या दोन गोलने असा एक विक्रम नोंदवला जो स्पर्धा इतिहासात प्रथमच घडलेला पाहायला मिळाला.