

FIFA World Cup 2026
Sakal
FIFA World Cup 2026 Live Streaming Details: जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाची विश्वकरंडक स्पर्धा आता काही दिवसांवर आली आहे. (भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे). आत्तापर्यंतच्या विश्वकरंडक स्पर्धांच्या तुलनेत ही स्पर्धा सर्वांत मोठी असणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको असे तीन यजमान देश, ४८ संघ, १६ स्टेडियम, ३९ दिवस आणि १०४ सामने, अशी मोठी मेजवानी मिळणार आहे.
गत स्पर्धेत ३२ संघ खेळले होते. यंदा ही संख्या ४८ पर्यंत वाढली आहे. १२ गट असून, त्यात प्रत्येकी चार संघ आहेत. प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळेल. त्यानंतर ३२ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. हे ३२ संघ साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम ८ संघ असे मिळून ठरणार आहेत.