

FIFA World Cup 2026 New Rules
Sakal
फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला (FIFA World Cup 2026) ११ जूनपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये या स्पर्धेसाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच आता या वर्ल्ड कपपासून काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत, ज्यांचा परिमाण खेळावर होणार आहे.
या नियमांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या मंडळाने (IFAB) मंजुरी दिली आहे. हे नियम केवळ वर्ल्ड कपसाठीच नाही, तर त्यानंतर जगभरातील २०२६-२७ च्या हंगामांमध्येही लागू राहतील. सामन्यांमध्ये गती रहावी आणि खेळाडू व चाहत्यांचा अनुभव सुधारण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.