FIFA World Cup 2026 Groups Announced
esakal
FIFA World Cup 2026 group stage : FIFA फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ चे गट शुक्रवारी जाहीर झाले असून चाहत्यांसाठी हा ड्रॉ म्हणजे एक जबरदस्त पर्वणीच आहे. कायलिन एमबाप्पे आणि एर्लिंग हालँड हे दोन युवा सुपरस्टार्स एकाच गटात आमनेसामने येणार आहेत. यावेळी फिफाने पहिला "शांतता पुरस्कार" अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केला. फिफाने यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता पुरस्काराची घोषणा केली होती आणि या कार्यक्रमादरम्यान फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी त्यांना ट्रॉफी, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.