Fifa World Cup 2026 : यमाल दे धमाल! स्पेनच्या Lamine Yamal ने इतिहास घडविला; पेले यांच्यानंतर तोच... मेस्सीचाही विक्रम मोडला

Spain star Lamine Yamal breaks World Cup records: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये स्पेनचा युवा सुपरस्टार लामिने यमाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या चमकदार खेळाने जगभरातील फुटबॉलप्रेमींना भुरळ घालणाऱ्या यमालने आता वर्ल्ड कपच्या इतिहासातही आपले नाव कोरले आहे.
Lamine Yamal breaks Messi record

Lamine Yamal breaks messi record

esakal

Updated on

Lamine Yamal historic goal at FIFA World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी माजी विजेत्या स्पेनने ४-० अशा फरकाने सौदी अरेबियावर विजय मिळवून पुढील फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात १०व्या मिनिटाला गोल करणाऱ्या लामिने यमाल याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले ( Pele) यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो जगातील दुसराच खेळाडू ठरला. यमालसह माइक ओयार्झबालने दोन गोल केले, तर एक गोल हसन अल्टमबक्तीने स्वयंगोलमुळे मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com