Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Lionel Messi 𝐌𝐎𝐒𝐓 𝐆𝐎𝐀𝐋𝐒 in World Cup history : फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सी याने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये आणखी एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. अर्जेंटिनाच्या या दिग्गज कर्णधाराने वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनत नवा इतिहास रचला.
Lionel Messi become the highest goal scorer in FIFA World Cup history

Lionel Messi become the highest goal scorer in FIFA World Cup history

esakal

Updated on

Argentina vs Austria Fifa World Cup 2026: क्रिकेटमध्ये विराट कोहली अन् फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सी... हे दोन्ही महान खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतात, तेव्हा कोणतातरी विक्रम मोडतातच. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये मेस्सीने पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक करून अनेक विक्रम मोडले. सोमवारी तो जेव्हा अर्जेंटिनाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रियाचा सामना करायला उतरला, तेव्हाही त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर हा विक्रम तो १०व्या मिनिटाला सहज करू शकला असता, परंतु पेनल्टी हुकल्याने चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागली. मात्र, या महान फुटबॉलपटूने त्याला G.O.A.T का म्हटले जाते, हे पुन्हा जगाला दाखवून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com