Neymar Jr will miss Brazil's FIFA World Cup 2026 opening match against Morocco
esakal
Why is Neymar Jr missing Brazil vs Morocco match? माजी विजेत्या ब्राझिलला फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहीमेची सुरुवात नेयमार ज्युनियर शिवाय करावी लागणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी या वृत्ताला दुजोरा देताना क गटातील मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात नेयमार खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. पाचवेळच्या वर्ल्ड कप विजेता ब्राझील २०२२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या मोरोक्कोला पुढील आठवड्यात शनिवारी न्यू यॉर्कच्या न्यू जर्सी स्टेडियमवर भिडणार आहे.