CURACAO MAKES HISTORY WITH FIRST-EVER WORLD CUP GOAL AGAINST GERMANY
esakal
Livano Comenencia fires Curacao Enters World Cup History Books: माजी वर्ल्ड कप विजेत्या जर्मनीने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी क्युरासाओ या कॅरेबियन बेटावरील लहान देशावर ७-१ असा दणदणीत विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात झालेला हा वर्ल्ड कप स्पर्धेतील ७२ वर्षानंतरचा सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्ली १९५४ मध्ये हंगरीने ९-० अशा फरकाने दक्षिण कोरियावर विजय मिळवला होता. पण, या सामन्यात जर्मनीच्या ७ गोलपेक्षा क्युरासाओच्या एका गोलची जगभर चर्चा आहे.