Miguel Almiron received a red card
esakal
FIFA World Cup 2026 Paraguay vs Turkey strange red card incident: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतून हैती व तुर्की हे दोन संघ बाद झाले आहेत. या दोघांनाही शनिवारी ब्राझील व पॅराग्वेकडून पराभव पत्करावा लागला. त्यांना हा स्पर्धेतील दुसरा पराभव असल्याने साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पण, शनिवारचा दिवस चर्चेत राहिला तो पॅराग्वेच्या मिग्युएल अल्मिरॉन ( Miguel Almirón ) याच्यावर झालेल्या कारवाईमुळे... सॅन फ्रान्सिस्को येथे तुर्कीविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्ध्याशी बोलताना तोंड झाकल्याबद्दल पॅराग्वेचा अल्मिरॉनना रेड कार्ड दाखवण्यात आले.. या कारणामुळे रेड कार्ड दाखवण्यात आलेला तो पहिला खेळाडू ठरला.