Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

South Africa vs South Korea FIFA World Cup 2026 result: फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला. दक्षिण कोरियावर महत्त्वपूर्ण विजय मिळवत त्यांनी प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेने गट टप्प्यातील आव्हान यशस्वीपणे पार केले.
South Africa reached the FIFA World Cup knockout stage for the first time in history

South Africa reached the FIFA World Cup knockout stage for the first time in history

esakal

Updated on

South Africa reach FIFA World Cup knockout stage: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेची वाटचाल रोलर कोस्टरसारखी राहिली... मेक्सिकोविरुद्धच्या पहिल्याच साखळी सामन्यात दोन रेड कार्डमुळे दक्षिण आफ्रिकेला जबर धक्का बसला... त्यात त्यांचा पराभवही झाला. अ गटातील दुसऱ्या सामन्यात त्यांनी झेचिआला १-१ असे बरोबरीत रोखून स्पर्धेतील आव्हान कायम राखले आणि आज पहाटे दक्षिण कोरियावर १-० असा विजय मिळवून Round of 32 मध्ये प्रवेश केला. ६३ व्या मिनिटाला थापेलो मासेकोच्या गोलने हा चमत्कार घडवून आणला आणि आफ्रिकेचा संघ प्रथमच बाद फेरीत पोहोचला. आफ्रिकेच्या या ऐतिहासिक कामगिरीचं सेलिब्रेशन मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडूनही केलं गेलं.. पण का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com