Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडले

Spain qualification scenario in FIFA World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील बलाढ्य स्पेन संघाला पहिल्याच सामन्यात अनपेक्षित धक्का बसला आहे. वर्ल्ड कप पदार्पण करणाऱ्या केप व्हर्दे संघाने स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखत ऐतिहासिक कामगिरी केली.
Spain qualification scenario in FIFA World Cup 2026

Spain qualification scenario in FIFA World Cup 2026

esakal

Updated on

Can Spain qualify after draw against Cape Verde? २०१० च्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या स्पेनचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल का? असा प्रश्न कालच्या निकालानंतर सर्वांना पडला आहे. पुणे शहरापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केप व्हर्दे संघाने बलाढ्य स्पेनला ०-० असे बरोबरी रोखले. त्यामुळे H गटात त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले आणि ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण, केप व्हर्देविरुद्धच्या अनपेक्षित बरोबरीने स्पेनचे समीकरण नक्कीच गुंतागुंतीचे झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com