Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Mexico vs South Africa FIFA World Cup 2026 match report: फिफा विश्वचषक २०२६ ची सुरुवात यजमान मेक्सिकोने शानदार विजयाने केली. अझ्टेका स्टेडियमवर झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली.
Mexico vs South Africa FIFA World Cup 2026 match report

Mexico vs South Africa FIFA World Cup 2026 match report

esakal

Updated on

Mexico beat South Africa 2-0 World Cup opener: सहयजमान मेक्सिकोने फिफा वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात दणदणीत विजयाने केली. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आपल्या सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला २-० ने पराभूत केले. अझ्टेका स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावर मेक्सिकोचे पूर्णपणे वर्चस्व होते. सुरुवातीपासूनच मेक्सिकोने चेंडूवर नियंत्रण ठेवले आणि दक्षिण आफ्रिकेच्या बचावफळीवर सतत दबाव टाकला. पण, हा सामना चर्चेत आला तो तीन रेड कार्ड्समुळे. फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उद्घाटनीय सामन्यात तीन रेड कार्ड दिले गेले. २०२२ च्या संपूर्ण स्पर्धेत ४ रेड कार्ड दिले गेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com