Argentina and Portugal Fixtures
ESAKAL
FIFA special honour for Messi and Ronaldo explained: अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची स्वप्नवत सुरूवात करताना अल्जेरियाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली. पण, पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला काँगो डीआरविरुद्ध एकही गोल करता आलेला नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत, परंतु स्पर्धा अजून संपलेली नाही. आता कुठे वर्ल्ड कप सुरू झाला आहे आणि हे दोन्ही महान खेळाडू पुन्हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत. पण, मेस्सीपेक्षा रोनाल्डोवर अधिक दडपण असेल, हे वेगळे सांगायला नको.