FIFA World Cup 2026: कतारवर विजय मिळवून बोस्नियाची आगेकूच; कॅनडाला नमवून स्वित्झर्लंड अव्वल
Bosnia and Herzegovina qualify for FIFA World Cup knockout stage: बोस्निया-हर्झेगोविनाने कतारचा 3-1 असा पराभव करत इतिहासात प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला, तर स्वित्झर्लंडने कॅनडाला हरवत ग्रुप बीमध्ये अव्वल स्थान पटकावले.
सीटल ः विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्यांदा खेळणाऱ्या बोस्निया-हर्झेगोविनाने बाद फेरी निश्चित केली. त्यांनी कतारवर ३-१ असा शानदार विजय नोंदवून ब गटातून सर्वोत्तम तिसरा संघ बनण्याचा मान मिळविला.