FIFA World Cup : उर्वरित तिकीटे पुढच्या आठवड्यात होणार खुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup Qatar remaining tickets available from next week

FIFA World Cup : उर्वरित तिकीटे पुढच्या आठवड्यात होणार खुली

FIFA World Cup : कतारमध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपची (FIFA World Cup Qatar) उर्वरित तिकिटे पुढच्या आठवड्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबतची माहिती फिफाने आज दिली. ही तिकिटे प्रथम येणाऱ्याला प्राधान्य अशा पद्धतीने विकली जाणार आहेत. जवळपास 18 लाख तिकीटे (Ticket) पहिल्या दोन सत्रात विकली गेली आहेत. मात्र आता किती तिकीटे शिल्लक आहेत याची मात्र फिफाने माहिती दिली नाही.

हेही वाचा: ICC T20I Ranking : पाकच्या बाबर आझमने विराट कोहलीला टाकले मागे

मध्य आशियातील कतार हे पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप आयोजित करणार आहे. हा वर्ल्ड कप 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा कतारची राजधानी दोहा येथील आठ स्टेडियमवर होणार आहे. सध्याच्या सत्रातील तिकीटे ही 5 जुलैच्या दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

फिफाने अधिकृत वक्तव्यात 'येत्या तिकीट विक्रीवेळी जागभरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.' अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाखो तिकीटे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर यात काही प्रायोजकांचीही तिकीटे असणार आहेत. गेल्या आठवड्यात वर्ल्ड कप प्रमुख आयोजक हसन - अल - थावडी यांनी सांगितले होते की आतापर्यंत 12 लाख तिकीटे विकली गेली आहेत.

हेही वाचा: Udaipur Murder Case : इरफान पठाणनंतर आता अमित मिश्राचं ट्विट

फिफाचे अध्यक्ष गिआनी इनफँटिनो यांनी सांगितले की 80 हजार क्षमतेच्या लुसैल स्टेडियममध्ये होणाऱ्या फक्त फायलनसाठी जवळपास 50 लाख विनंतीअर्ज आले आहेत. दोहाची लोकसंख्या जवळपास 24 लाख इतकी आहे. याचबरोबर मर्यादित राहण्याचा जागा यामुळे 32 संघांच्या पाठीराख्यांची मोठी गर्दी आणि गैरसोय देखील होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात कतारने शेजारील आखाती देशांमध्ये विमानसेवा वाढवणार असल्याचे सांगितले. यावरून पाठीराखे इतर देशात राहून तेथून सामन्यावेळी विमानाने येऊ शकतील.

Web Title: Fifa World Cup Qatar Remaining Tickets Available From Next Week

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top